शिंदे गट आज किंवा उद्या मुंबईत परतणार; केसरकरांची माहिती
बंडखोर आमदारांचा गट आज किंवा उद्या मुंबईत परतणार आहे. याबाबत आमदार दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. आज शिंदे गटाची महत्त्वाची बैठक देखील होणार आहे.
मुंबई : सध्या बंडखोर आमदारांचा गट हा गोव्यातच आहे. दरम्यान उद्या शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांचा गट आज किंवा उद्या मुंबईत परतणार आहे. याबाबत बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. त्यापूर्वी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गोव्यात शिंदे गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे.
Published on: Jul 02, 2022 09:36 AM