ShivSena : शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांचा भाजपात प्रवेश

| Updated on: Sep 08, 2022 | 7:10 PM

लवकरच संपूर्ण अमरावती लोकसभा, तिवसा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवेश घेतील. अनेक शिवसेना प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत.

अमरावती : शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज झाला. प्रदीप गौरखेडे उपजिल्हाप्रमुख, प्रदीप तेलखडे, संजय देशमुख यांनीसुद्धा भाजपात प्रवेश केला. यावेळी बावनकुळे म्हणाले, शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी पाच हजार कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. आज मुख्य 20 कार्यकर्त्यांचा इथे प्रवेश झाला. राजेश वानखडेच्या नेतृत्त्वात चालणारी अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना भाजपात आलीय. राजेश वानखडे यांनी अनेक आंदोलनं केलीत. 2019 ला विधानसभा निवडणुकीत त्यांना 66 हजार मतं मिळवली होती. लवकरच संपूर्ण अमरावती लोकसभा, तिवसा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवेश घेतील. अनेक शिवसेना प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत.

Published on: Sep 08, 2022 07:10 PM
Amravati Police : अमरावतीची तरुणी म्हणते मी,रागातून निघून गेले, पोलीस आयुक्तांची माहिती
BJP : विदर्भात ठाकरे गट नावालाही राहणार नाही, बावनकुळेंचे थेट आव्हान..!