Special Report | देवेंद्र फडणवीस सीएम झाल्यास तर राणे मर्सिडीज देणार!-TV9
पिंपरी-चिंचवडमधल्या देशातल्या सर्वात मोठ्या बैलगाडीची शर्यत पाहून नितेश राणे इतके भारावले, की त्यांनी मंचावरुन अनोखी घोषणाच जाहीर केली. ती म्हणजे फडणवीस ज्यावर्षी मुख्यमंत्री होतील, त्यावर्षी बैलगाडा शर्यत विजेत्याला नितेश राणे वैयक्तिक स्वरुपात मर्सिडिज बेंज गाडी बक्षीस म्हणून देतील.
पिंपरी-चिंचवडमधल्या देशातल्या सर्वात मोठ्या बैलगाडीची शर्यत पाहून नितेश राणे इतके भारावले, की त्यांनी मंचावरुन अनोखी घोषणाच जाहीर केली. ती म्हणजे फडणवीस ज्यावर्षी मुख्यमंत्री होतील, त्यावर्षी बैलगाडा शर्यत विजेत्याला नितेश राणे वैयक्तिक स्वरुपात मर्सिडिज बेंज गाडी बक्षीस म्हणून देतील. मात्र या घोषणेत नितेश राणेंनी ज्या वर्षी फडणवीस मुख्यमंत्री होतील, हा शब्द दोन वेळा वापरला. त्यामुळे त्याचीही सोशल मीडियात चर्चा झाली…कारण, नारायण राणेंपासून चंद्रकांत पाटलांनी भाजप पुन्हा सत्तेत येण्याच्या अनेक तारखा दिल्या होत्या. मात्र नितेश राणेंनी कोणतीही तारीख न देता फक्त वर्षाचा उल्लेख केला. पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगेंनी बैलगाडा शर्यत भरवली होती.. राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक इथं आले. कारण बक्षीसाची एकूण रक्कम दीड कोटींच्या घरात होती. बंदी उठवल्यानंतरच्या यंदाच्या बैलगाडा शर्यती बक्षीसेची रक्कम आणि राजकीय नेत्यांच्या भाषणांनी गाजल्या. पहिलं बक्षीस होतं जेसीबी…दुसरं बोलेरो…तिसरं ट्रॅक्टर, चौथं बुलेट आणि तब्बल ११६ दुचाकी.. यापैकी रामनाथ वारिंगेंची बैलजोडीनं त्यांच्या मालकाला जेसीबी मिळवून दिला. तिकडे चिखली जाधववाडीतल्या बैलगाडा शर्यतीत फडणवीसांनीही फिल्मी डायलॉगनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.