Special Report | आव्हाड म्हणतात Raj Thackeray नवे Johnny Lever -Tv9

| Updated on: Apr 13, 2022 | 8:56 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी, आव्हाडांची नक्कल करुन, त्यांच्या चेहऱ्यांवरुन टिप्पणी केली..त्यानंतर आव्हाडांनी राज ठाकरेंच्या भाषणाचीच चिरफाड करत, त्यांना राजकारणातील जॉनी लिव्हर म्हटलंय. शेपूट धरुन गरगर फिरवून फेकून देतो, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी आव्हाडांवर केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी, आव्हाडांची नक्कल करुन, त्यांच्या चेहऱ्यांवरुन टिप्पणी केली..त्यानंतर आव्हाडांनी राज ठाकरेंच्या भाषणाचीच चिरफाड करत, त्यांना राजकारणातील जॉनी लिव्हर म्हटलंय. शेपूट धरुन गरगर फिरवून फेकून देतो, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी आव्हाडांवर केली. त्यावरुन आव्हाडांनी गरगर फिरवायला काय ? मालमत्ता आहे का ? असा पलटवार केला. राज ठाकरेंना ईडीनं एकदा चौकशीसाठी बोलावल्यानंच, राज ठाकरे भाजपची बाजू घेत असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली होती..ठाण्यात पुन्हा राज ठाकरेंनी सुळे आडनाववरुन पुन्हा निशाणा साधला. त्यावरुन आव्हाडांनी राज ठाकरेंना जळजळीत टोला लगावला.3 मे पर्यंत म्हणजे ईदनंतर मशिदीवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम राज ठाकरेंनी सरकारला दिलाय.त्यावरुन जातीय तेढ माजवण्यासाठी सुपारी घेतली का ? असा सवालही आव्हाडांनी केलाय.

VIDEO :Prakash Ambedkar | विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी करून निलंबित करा
Special Report | Raj Thackeray यांचा ‘पॉवर’फुल्ल समाचार -tv9