Special Report | राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचं नाव पुन्हा चर्चेत, नाना पटोले म्हणतात काँग्रेसचा फुल सपोर्ट!

| Updated on: Jun 13, 2022 | 12:26 AM

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आणि ममता बॅनर्जी यांनी देशातल्या 22 नेत्यांना बैठकीचं आमंत्रण दिलं. यानंतर एकच चर्चा सुरु झाली ती म्हणजे शरद पवार राष्ट्रपती होणार का? शरद पवारांच्या नावाला आता महाराष्ट्र काँग्रेसनंही पाठिंबा जाहीर केलाय.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आणि ममता बॅनर्जी यांनी देशातल्या 22 नेत्यांना बैठकीचं आमंत्रण दिलं. यानंतर एकच चर्चा सुरु झाली
ती म्हणजे शरद पवार राष्ट्रपती होणार का? शरद पवारांच्या नावाला आता महाराष्ट्र काँग्रेसनंही पाठिंबा जाहीर केलाय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची मोट बांधण्याची मोहिम तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी हातात घेतलीय. त्यासाठी ममता बॅनर्जींनी देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

ममतांचं आमंत्रण कुणाला?

उद्धव ठाकरे
शरद पवार
सोनिया गांधी
अरविंद केजरीवाल
भगवंतसिंह मान
अखिलेश यादव
फारुख अब्दुल्ला
एम के स्टॅलिन
सीताराम येचुरी

यांच्यासह 22 प्रमुख नेत्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलंय. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची रणनिती ठरणार आहे. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2024 रोजी संपणार आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी….

नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत 29 जूनपर्यंत आहे.

30 जूनपर्यंत नामांकन अर्जांची छाननी केली जाईल

2 जुलैपर्यंत उमेदवारांना नामांकन मागे घेता येईल

18 जुलैला मतदान होईल

21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे

पण अद्यापही भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. भाजपकडून उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नावं चर्चेत आहेत. पण पंतप्रधान मोदी यापेक्षा वेगळ्या नावांची घोषणा करुन विरोधकांना धक्काही देऊ शकतात विरोधी पक्षांकडून कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.

Published on: Jun 13, 2022 12:26 AM
Special Report | पंकजा मुंडे समर्थकांच्या निशाण्यावर आता भाजपचे नेते! प्रवीण दरेकरांचा ताफा रोखला
Special Report | शिवसेना आमदार संजय राठोडांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडणार?