Special Report | Ganesh Naik को पकडना मुश्किल है…? -tv9
ऐरोलीचे भाजपचे आमदार आणि नवी मुंबईचे दिग्गज नेते गणेश नाईकांच्या मागे पोलीस लागलेत...बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, नाईकांनी ठाण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र न्यायालयानं त्यांना जामीन नाकारलाय.
ऐरोलीचे भाजपचे आमदार आणि नवी मुंबईचे दिग्गज नेते गणेश नाईकांच्या मागे पोलीस लागलेत…बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, नाईकांनी ठाण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र न्यायालयानं त्यांना जामीन नाकारलाय. त्यामुळं गणेश नाईक आता हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे, तर नवी मुंबई पोलिसांकडून 6 जणांची टीम गणेश नाईकांचा शोध घेतेय. घर, कार्यालय ते नाईकांच्या फार्म हाऊसवरही पोलीस जाऊन आलेत. मात्र गणेश नाईक सध्या नॉटरिचेबल आहेत. विशेष म्हणजे महिला आयोगानं नाईकांना अटक करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना नवी मुंबई पोलिसांना दिल्यात. मात्र 4 दिवस उलटूनही पोलिसांकडून नाईकांना अटक झालेली नाही.एका महिलेच्या तक्रारीनंतर गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून माझ्या 15 वर्षांच्या मुलाला वडील गणेश नाईकांचं नाव मिळावं, अशी मागणी या महिलेची आहे.