मुंबईतल्या कांदिवलीमधील मशिदीतला एक अजानचा कथित व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार त्या मशिदीतून अजान वाजलीच नाही…मात्र मनसैनिकांनी जो व्हिडीओ दाखवलाय, त्यात अजानचा आवाज ऐकू येतोय.या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण अनेक गमतीशीर गोष्टी या व्हिडीओत दडल्याचा आरोप होतोय. ठिकाण आहे कांदिवलीतलं गणेश नगर. वेळ होती 4 तारखेच्या पहाटेची. पहाटे ५ वाजता अजान सुरु होईल, म्हणून त्याविरोधात हनुमान चालिसा लावण्यासाठी काही मनसे कार्यकर्ते गच्चीवर चढले. त्या इमारतीच्या समोर एक मशीद होती. पहाटेचे ५ वाजले. आणि अजानचा आवाज सुरु झाला. त्याला उत्तर म्हणून इकडून मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली. पण या व्हिडीओमागचा खरा ट्विस्ट पोलिसांच्या एन्ट्रीनंतर समोर आला. तो ट्विस्ट नेमका काय,
हे समजून घेण्याआधी अजानचा आवाज आणि हनुमान चालिसेचा हा व्हिडीओ एकदा नीट बघा. एका बाजूला अजान वाजतेय, आणि दुसऱ्या बाजूला हनुमान चालिसा.