Special Report | सचिन वाझे माफीचा साक्षीदार, देशमुखांसह कोण गोत्यात?-TV9

| Updated on: Jun 01, 2022 | 8:58 PM

माफीचा साक्षीदार करण्यासाठी सचिन वाझेनं अर्ज केला होता, तो अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टानं स्वीकारलाय. अनिल देशमुखांसह अन्य आरोपींविरोधातली सर्व माहिती देण्यास वाझेनं तयारी दर्शवलीय.

ज्या 100 कोटींच्या सचिन वाझेंच्या आरोपानं, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली…त्याच प्रकरणात आता सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यात आलंय. माफीचा साक्षीदार करण्यासाठी सचिन वाझेनं अर्ज केला होता, तो अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टानं स्वीकारलाय. अनिल देशमुखांसह अन्य आरोपींविरोधातली सर्व माहिती देण्यास वाझेनं तयारी दर्शवलीय. आता 7 जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष हजर केलं जाणार आहे तसंच वाझे आता नियमित जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती वाझेच्या वकिलांनी दिलीय.  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी, मुख्यमंत्र्यांकडे लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवली होती. या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप केला होता..
अनिल देशमुख यांच्या आदेशानुसारच मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे गोळा करत असल्याचं वाझेनं तपासा दरम्यान सांगितलंय.

या प्रकरणात अनिल देशमुखांसह 6 जणांना अटक केली. यात देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे, कुंदन शिंदे, वकील आनंद डाग यांचा समावेश आहे. अनिल देशमुख सध्या आर्थर रोड 6 नोव्हेंबर 2021ला माजी गृहमंत्री देशमुख आर्थर जेलमध्ये गेलेत. 6 महिने 26 दिवपासांपासून देशमुख जेलमध्येच आहेत. अजून त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यातच आता सचिन वाझेच माफीचा साक्षीदार झाल्यानं, देशमुखांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.

Published on: Jun 01, 2022 08:58 PM
Special Report | भाजप महिलांच्या टार्गेटवर सेनेच्या दिपाली सय्यद?-TV9
Special Report | देवेंद्र फडणवीस सीएम झाल्यास तर राणे मर्सिडीज देणार!-TV9