Special Report | शिवसेना गृहखात्यावर आणि कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांवर नाराज? – Tv9
काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरच भाष्य केलंय. शरद पवार मुख्यमंत्री असते तर परिस्थिती वेगळी असती असं यशोमती ठाकूर म्हणाल्यात. त्यामुळं काँग्रेसला पवार मुख्यमंत्री हवेत का?, अशी चर्चा सुरु झालीय.
काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरच भाष्य केलंय. शरद पवार मुख्यमंत्री असते तर परिस्थिती वेगळी असती असं यशोमती ठाकूर म्हणाल्यात. त्यामुळं काँग्रेसला पवार मुख्यमंत्री हवेत का?, अशी चर्चा सुरु झालीय. आणि वेगळ्याच चर्चेला फोडणी दिली. अमरावतीत यशोमती ठाकुरांनी बोलल्या, त्यावेळी पवार स्टेजवरच होते. ठाकूर यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट आहे की, पवारच मुख्यमंत्री हवे होते. आणि वेगळी परिस्थिती असती म्हणजे, सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जो कारभार सुरु आहे, त्यापेक्षा चांगली स्थिती असती. यशोमती ठाकूर यांनी पवार मुख्यमंत्री हवे होते असं म्हटल्यावर शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हेंनी चांगलाच टोला लगावला. पवारांना यूपीएच अध्यक्ष करण्यासाठी तुम्हीच तसा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे द्या, असं निलम गोऱ्हे म्हणाल्यात.