पंकजा मुंडे यांना बाळासाहेब थोरात यांच्याकडून काँग्रेस प्रवेशाची ऑफर; सुधीर मुनगंटीवार म्हणतात…
राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पंकजा मुंडे यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे. त्यांच्यासाठी काँग्रेसची दारे सताड उघडी असल्याचं थोरात म्हणाले. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पंकजा मुंडे यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे. त्यांच्यासाठी काँग्रेसची दारे सताड उघडी असल्याचं थोरात म्हणाले. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक बरं झालं काँग्रेसने त्यांचे दरवाजे उघडले.पंकजा मुंडे या दरवाज्यातून आत जातील की, नाही हे माहित नाही. पण काँग्रेसचे अनेक नेते बाहेर पडतील हे खरं आहे. पंकजा मुंडे कसं जाती काँग्रेसमध्ये? त्यांची वैचारिक भूमिका काय आहे? मला आनंद आहे बाळासाहेब थोरात आणि दरवाजा उघडल्यामुळे तिथे अनेक लोक वाट पाहत आहेत ते येत्या महिन्यात बाहेर पडतील,असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Published on: Jun 04, 2023 10:12 AM