Special Report | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचा वाद, पुतळा हटवला; कारवाईच करा कोणाची मागणी?

| Updated on: May 30, 2023 | 8:43 AM

या कार्यक्रमावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच जाब विचारला आहे.

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजप-शिवसेनेचे खासदारही उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच जाब विचारला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आगपाखड केली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत असं होण हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं होते. त्यानंतर आता यावरून महाराष्ट्र सदनाकडून खुलासा करण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आमच्यासाठी पूजनीय आणि आदरणीय आहेत. त्यांच्याविषयीचा आदर प्रत्येक देशवासीयांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांचा अनादर होणार नाही. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असून ते याबाबतचा खुलासा करणार आहेत. शेवटी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले हे आमच्यासाठी फार आदरास्थानी आहेत. मात्र यानंतरही विरोधकांसह भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेत याप्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 30, 2023 08:43 AM
Special Report | लोकसभा आणि विधानसभा एकत्र होणार? सामनातून नेमका इशारा कोणाला? एकत्र निवडणुका झाल्यास फायदे-तोटे काय?
‘खांद्यावर हात ठेवायचा अन् त्याचाच खेळ खल्लास…’, सामनातून पुन्हा भाजपवर हल्लाबोल