Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घालूनपाडून बोलणं मान्य नाही- आशिष शेलार

Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घालूनपाडून बोलणं मान्य नाही- आशिष शेलार

| Updated on: Jul 26, 2022 | 1:44 PM

मुख्यमंत्री पदी असलेल्या व्यक्तीला घालूनपाडून बोलणे हे अतिशय निंदनीय असून हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असल्याचेही शेलार म्हणाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना खालूनपडून बोलणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केले. शिवसेनेने (Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पालापाचोळा म्हंटले होते त्यावरून आशिष शेलार यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावले. मुख्यमंत्री पदी असलेल्या व्यक्तीला घालूनपाडून बोलणे हे अतिशय निंदनीय असून हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असल्याचेही शेलार म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री पदाचा अपमान केला म्हणून अनेकांना अटक करण्यात आली होती आता मात्र सामनाच्या मुलाखतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घालूनपाडून बोलण्यात येत आहे, हे महाराष्ट्राला अजिबात मान्य नाही असेही शेलार म्हणाले.

Ashish Shelar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घालूनपाडून बोलणं मान्य नाही : आशिष शेलार-Tv9

Published on: Jul 26, 2022 01:44 PM
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला 62 किलोचा प्रसाद!
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणुकीत भाजप खा. रामदास तडस यांची बिनविरोध निवड