अमोल मिटकरी यांचा केसीआर यांच्यावर निशाना; ‘ठणकावलं! वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका’
बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचअनुशंगाने त्याचा सोलापूर दौरा होत आहे. यासाठी ते हैद्राबादवरून निघाले असून त्यांच्याबरोबर 400 ते 600 वाहणांचा ताफा आहे. तर यावेळी त्यांचे अख्खे मंत्रीमंडळच सोबत आहे.
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्रात येऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचअनुशंगाने त्याचा सोलापूर दौरा होत आहे. यासाठी ते हैद्राबादवरून निघाले असून त्यांच्याबरोबर 400 ते 600 वाहणांचा ताफा आहे. तर यावेळी त्यांचे अख्खे मंत्रीमंडळच सोबत आहे. ते पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. यावरून सध्या चर्चा होताना दिसत आहे. तर टीका ही. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्या मेजवाणीचा फोटो ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा असा सल्ला दिला आहे. तर पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका असं म्हटलं आहे. त्याचबोरबर महाराष्ट्रात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापुर्वी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचे बेत आखले जात आहेत. बॅनरवर पांडुरंगाचे फोटो तर मटणावर ताव हाणून पंढरीत आगमन? @TelanganaCMO पंढरीची वारी पवित्र आहे ती अपवित्र करू नका असे म्हटलं आहे.