ठाकरे गटाचा उद्या मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा, मातोश्री परिसरात झळकले बॅनर्स
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराप्रकरणी ईडीने ठाकरे गटाशी संबंधित नेत्यांच्या घरावर धाडी मारल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठाकरे गटाने महापालिकेवर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 1 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराप्रकरणी ईडीने ठाकरे गटाशी संबंधित नेत्यांच्या घरावर धाडी मारल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठाकरे गटाने महापालिकेवर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 1 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मातोश्री परिसरात ठाकरे गटाकडून महापालिकेविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून कलानगर परिसरात महानगरपालिका विरोधात मोर्चाचे बॅनर लावण्यात आले आहे.
Published on: Jun 30, 2023 01:03 PM