फडणवीस गुन्हेगार तुमच्या मंत्रिमंडळात मोकाट; तुम्ही मांडिला मांडी लावून बसता; राऊतांचा घणाघात

| Updated on: Apr 23, 2023 | 11:37 AM

यावेळी गुलाबराव पाटील यांची गुलाबो गँग असल्याचं सांगतानाच आज पाटील यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. कोरोना काळात गुलाबराव पाटील यांनी 400 कोटी रुपायांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस गुन्हेगार तुमच्या मंत्रिमंडळात मोकाट; तुम्ही मांडिला मांडी लावून बसता; राऊतांचा घणाघात
Image Credit source: tv9
Follow us on

जळगाव : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारसह उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी फडणवीस यांच्यावर गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि राहुल कूल यांच्या भ्रष्टाचारावरून टीका केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत यांनी ही टीका केली. कोरोना काळात गुलाबराव पाटील यांनी 400 कोटी रुपायांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. दादा भुसे आणि राहुल कूल यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात आपण सर्व माहिती फडणवीस यांना दिली आहे. मात्र त्यांना पाठिशी घालण्याचे काम सुरू आहे. या भ्रषाटारावर बोला. ते सतत म्हणतात की, गृहमंत्री झाल्यापासून अनेकांना अडचण झालेली आहे. तर कसलीही अडचण झालेली नाही. उलट भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार तुमच्या मंत्रिमंडळात मोकाट आहेत. तुमच्या मंत्रिमंडळात तुमच्या मांडीला मांडी लावून हे गुंड, भ्रष्टाचारी बसतात. तुम्ही आम्हाला काय सांगताय? सगळी प्रकरण आम्ही बाहेर काढू. या भीती पोटीच सभेवर दगड मारू अशी वक्तव्य केली जात आहेत. गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि राहुल कूल यांचे प्रकरणे सरकार का दाबत आहे. फडणवीस कोणाला वाचवत आहात? फडणवीस मंत्रिमंडळात गुंडांची टोळी चालवत आहेत का? भ्रष्टाचारांची टोळी चालवत आहात का असे प्रश्न केले आहेत.