ठाणे : शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. “रात्री-दुपारी-दिवसा यांना फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच दिसतात. एवढे हे लोक मुख्यमंत्र्यांना घाबरलेले आहेत. मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करतात. त्यामुळे विरोधकांना यापुढे कधी भविष्यात सत्ता मिळेल असा दिसत नाही. मुख्यमंत्र्यांना जी पदवी मिळाली आहे. ती समाजसेवासाठी मिळाली आहे. तुम्ही कोोरना काळात घराच्या बाहेर पडले नाहीत. आताचे मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करून जनतेच्या हिताचे निर्णय घेतात, असं म्हस्के म्हणाले आहेत. संजय राऊत यांनाही डी.लिट पदवी देणं गरजेचं आहे. कारण संजय राऊतने शिवसेना फोडली म्हणून उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे विचार विसरायला लावले. राष्ट्रवादीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेच्या मनामध्ये ठासून भरली. त्याकरिता संजय राऊत यांना डॉक्टरेट पदवी मिळाली पाहिजे, असंही म्हस्के म्हणाले आहेत.