Video | केंद्राच्या धोरणाने पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचे भले, खासदार अमोल कोल्हे यांचा लोकसभेत घणाघाती हल्ला
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तडफदार भाषण केले आहे. केंद्र सरकार एकीकडे म्हणते पाकिस्तानची कंबर तोडणार आणि दुसरीकडे केंद्राच्या धोरणाने पाकिस्तानचे शेतकरी मालामाल होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या मतदार संघातील अनेक ज्वलंत समस्या त्यांनी आपल्या भाषणात मांडल्या आहेत.
मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर तडाखेबंद भाषण केले. आपल्या भाषणात अमोल कोल्हे यांनी जुन्नर येथील बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी आणि गुराख्यांचा प्रश्न मांडला. आपल्या मतदार संघात चारशे ते पाचशे बिबट्यांचा अधिवास असून दिवसा थ्री फेस लाईट नसल्याने रात्रीचे शेताला पाणी द्यावे लागते. त्यामुळे रात्रीचे काम करताना शेतकऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले होत असून बिबट्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे तसेच दिवसाची थ्री फेज वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. गेल्या 40 दिवसात केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मिडल ईस्ट मार्केट, युरोपचे मार्केट पाकिस्तानच्या कांदा शेतकऱ्याने काबिज केले आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. दीघी अम्युनेशन प्रकल्पामुळे दीड लाख घरे अनधिकृत ठरविली गेली आहे. इंग्रजांच्या कायद्याने रेड झोन ठरविल्याने ही पक्की घरे बेकायदा ठरली आहेत असा त्यांना आरोप केला. यावेळी राम मंदिरावरील कविता वाचून कोल्हे यांनी सर्वांची मने जिंकली आहेत.