कराड (सातारा) : कोरोनातून (Corona) बरं झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे (Eye) आणि नाकाचे (nose) आजार वाढत असून हार्ट अटॅकचेही (Heart attack ) प्रमाण वाढलं आहे. कोरोना झाल्यानंतर हे आजार का होत आहेत, याची काय कारणं असू शकतात? या आजाराला नक्की काय म्हणतात?, हे आजार होऊ नयेत यासाठी कोरोनामुक्त झाल्यावर काय काळजी घ्यायला हवी, याविषयी नेत्रविकार तज्ज्ञ डॉ राहुल फासे यांनी सविस्तर माहिती दिली. (The risk of other diseases like heart attack, eye and nose diseases increased after recovering covid 19 coronavirus)
कोव्हिडचे वैशिष्ट्यच रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होणे हे असून, शरिरातील अनेक छोट्या रक्तवाहिन्या गुठळ्या तयार झाल्याने त्या ब्लॉक होतात. खास करुन डोळे, हृदय, मेंदू यातील छोट्या रक्तवाहिन्या प्रामुख्याने ब्लॉग होऊन Vascular occlusion अर्था रक्तवहिनी ब्लॉक होऊन दृष्टी कमी होते.
Mucormycosis नाकातून sinuses मार्गे स्प्रेड हे आजार उद्भवतात. कोरोनामधून बरे झाल्यानंतर शुगर डायबिटीज असणाऱ्या पेशंटने रक्त पातळ होण्याचे औषध किंवा त्यांची अगोदर सुरू असणारी औषधं बंद करू नयेत, त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा, आपला ब्लड प्रेशर, शुगर वाढू देऊ नये.
काही लोकांमध्ये नाकातून sinuses मार्गे स्प्रेड होणारा Mucormycosis हा आजार उद्भवतो. तो डोळ्यांवर परिणाम करतो. हे प्रमाण जास्त असून डोळा गमावण्याची शक्यता असते. कोरोना डिस्चार्जनंतर तज्ञांच्या सल्ल्याने शुगर नियंत्रणात ठेवावी. वेळेत उपचार घेतले तर हे प्रमाण कमी राहू,न अंधत्व येणे तसेच जीवावर बेतणार नाही, असा सल्ला डॉ राहुल फासे यांनी दिला
संबंधित बातम्या
कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?