मॅटचा शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला दणका! महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

| Updated on: Jun 22, 2023 | 11:13 AM

महसूल विभागातील 66 अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता यासंदर्भात मॅटकडून सरकार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दणका देण्यात आला आहे.

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूल विभाग, कृषी विभाग, वन विभाग झालेल्या बदल्यांवरून सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी महसूल विभागातील 66 अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता यासंदर्भात मॅटकडून सरकार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दणका देण्यात आला आहे. तर महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यानांच आता स्थगिती दिली आहे. तर कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करत या बदल्या करण्यात आल्याचं निरीक्षण यावेळी मॅटकडून सरकारविरोधात नोंदवण्यात आलं. त्यामुळे हा शिंदे-फडणवीस सरकार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना धक्का मानला जात आहे.

Published on: Jun 22, 2023 11:13 AM
“नरहरी झिरवाळ बायकोला खांद्यावर घेऊन नाचवतात, पण…”, अजित पवार असं म्हणाले अन्….
“ठाकरे गटाने समोर आरसा ठेवून मोर्चा काढावा”, मनसेच्या ‘या’ नेत्याने केली टीका