शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात
भंडारा जिल्ह्यातील दहेगावमध्ये एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने घोड्यावरून नव्हे तर चक्क बैल गाडीतून वरात काढली. या वरातीची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यातील दहेगावमध्ये एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने चक्क बैलगाडीतून वरात काढली. यावेळी बैलगाडीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे बैलगाडीतून वरात काढण्यात आली तेव्हा डीजे देखील लावण्यात आला होता. वऱ्हाडी मंडळी डीडेच्या तालावर चांगलेच थिरकताना दिसते. या आगळ्या -वेगळ्या वरातीची तालुक्यात चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले. ग्रामस्थांकडून नवरदेवाचे कौतुक करण्यात येत आहे.