पुणे : पुण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त हा सन्मान करण्यात आला. यावेळी मात्र एक वेगळचं दृष्य अनेकांना पहायला मिळाल्याने राजकीय चर्चांना उत आला आहे. तर मनसे प्रमुखांच्या कार्यक्रमात एका सच्चा मनसैनिकांला जागा नसल्याचे म्हटलं जात आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यात राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुण्यातील मनसेचे अनेक कारायकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसे नेते वसंत मोरे देखिल उपस्थित होते.
मात्र याच कार्यक्रमात त्यांना सुमारे तासभर खुर्ची मिळाली नाही. तर मागच्या ठिकाणी उभे राहत त्यांना हा कार्यक्रम पहावा लागला. तर मनसेचे इतर नेते हे पुढच्या खुर्च्यांवर बसले होते. त्यामुळे सध्या पुण्यात वेगळ्याच चर्चांना उत येत आहे.