Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्स प्रकरण; पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया
Tuljapur Crime News : तुळजापूर ड्रग्स प्रकरणात 14 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर एकूण 21 आरोपी निष्पन्न झाले आहेत. याबद्दल पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी माहिती दिली आहे.
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आत्तापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी दिली आहे. या प्रकरणी एकूण 21 आरोपी निष्पन्न केले असून त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे, असंही जाधव यांनी सांगितलं आहे. हे आरोपी कोणत्या पक्षाचे, जातीचे, धर्माचे आहेत हे न पहाता सर्वांवर कारवाई होईल, असंही यावेळी बोलताना जाधव म्हणाले. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे. त्यामुळे यावर बोलताना जाधव यांनी सगळ्यांना केवळ आरोपी म्हणून बघितलं जाईल, आणि त्याच अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई होईल, असं स्पष्ट सांगितलं.
Published on: Apr 09, 2025 03:53 PM
