बीएमसीवर महायुतीचाच महापौर होणार; ठाकरे गटाला डिवचताना उदय सामंत यांच मोठं वक्तव्य
याचदरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गट आणि भाजपच्या युतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट गेल्याने राज्यातील समिकरणांची चालच आता बदलली आहे. तर आता शिंदे गटासह भाजप, शरद पवार गट आणि ठाकरे गटातून प्रवेश आणि पक्ष सोडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
रत्नागिरी, 29 जुलै 2023 | अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका आणि प्रमुख महापालिका निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गट आणि भाजपच्या युतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट गेल्याने राज्यातील समिकरणांची चालच आता बदलली आहे. तर आता शिंदे गटासह भाजप, शरद पवार गट आणि ठाकरे गटातून प्रवेश आणि पक्ष सोडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याचदरम्यान आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे सध्या ठाकरे काय बोलणार अशी चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांचा उत्तर भारतीयांचा ठाण्यात मेळावा होणार आहे. त्याचपार्श्वभूमिवर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे. तर उद्धव ठाकरे गटाचा साडेनऊचा इव्हेंट अजून सुरू झालेला नाही. ते आधी टीका करू दे. मग मी उत्तर देईन. त्यांच्या हिंदी भाषिकांच्या मेळाव्याला शुभेच्छा देताना, मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार असं ठाम मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे.