Special Report : “एक एक फोडण्यापेक्षा, डायरेक्ट…”, उद्धव ठाकरे यांचं एकनाथ शिंदे यांना आव्हान!
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात ठाकरे गटातील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांची अपकमिंग सुरुच आहे. आता ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे.
मुंबई, 30 जुलै, 2023 | शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांना एकावर एक धक्के मिळत आहेत. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात ठाकरे गटातील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांची अपकमिंग सुरुच आहे. आता ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे. सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं आश्वासन कार्यकर्त्यांनी दिलं. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jul 30, 2023 08:10 AM