उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, आले मोदींच्या मना…
चंद्रावरचं घर दूर राहीलं. तर त्या बाबांची जय हा भ्रम आहे. २०२४ नंतर केंद्रात मोदी सरकार देशात केंद्रात राहणार नाही. ठेवायचं नाही. युद्ध हे देशासाठी करायचं असतं. निवडणुकीसाठी नाही. सैन्य, जवान हे देशासाठी असतात. तुमच्या राजकीय पक्षाचे ते कार्यकर्ते नसतात, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
जळगाव, १० सप्टेंबर २०२३ : जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. आता संसदेचे खास अधिवेशन होत आहे. खास अधिवेशन बोलावले असेल, तर मराठा, धनगर, ओबीसी यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे. या सर्वांचे प्रश्न मांडून विशेष अधिवेशनात न्याय द्या. कारण तो अधिकार संसदेचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा, धनगर, ओबीसी समाजाचे प्रश्न मांडा. त्यांना न्याय द्या. शिवसेना हा तुम्हाला पाठिंबा देणारा पहिला पक्ष असेल. पण, मोदी सरकार नुसत्या थापा मारतो. सामान्य मतदार त्याला फसतो. चंद्रावर यान उतरले. त्यासाठी मी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. पुन्हा करतो. कारण त्यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. सूर्याचा अभ्यास करायला यान निघाले आहे. २०३० पर्यंत मी तुम्हाला चंद्रावर घरं देईन, अशी चेष्टा उद्धव ठाकरे यांनी केली. पण, अशा खोट्या आश्वासनांमुळे आपण मोदींना निवडून दिलं. अजून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं नाही. रोजगार मिळाला नाही. उज्ज्वला योजना सुरू आहे का. सौभाग्य योजनेचं काय झालं, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले.