ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची शिंदे गटावर जोरदार टीका

| Updated on: Jan 11, 2023 | 11:05 AM

यावेळी कार्यकारी मान्यता आणि शिंदे गटाच्या आक्षेपावर बोलताना खैरे म्हणाले, कार्यकारी मान्यता मिळाल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना पद मिळाले

मुंबई : काल पार पडलेल्या खरी शिवसेना कोण आणि धनुष्यबाणावरिल सुनावणीत शिंदे गटाचे वकील जेठमलाणी यांनी हल्ला केला होता. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी बेकायदेशिरपणे आपले नाव पक्षप्रमुख म्हणून लावून घेतले. यावर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

यावेळी खैरे यांनी, आधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या पदाला मान्यता मिळाली. त्यानंतर मला, आनंद दिघे आणि यानंतर अडसुळांना ती मिळाली. ही मान्यता कार्यकारी मान्यता मिळाल्यानंतरच पदे मिळाली. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना सुद्धा कार्यकारी मान्यतेनेच मिळाली.

शिंदे गटाने एखाद्या पदासाठी पक्षातंर्गत निवडणूक व्हावी लागते. पण ती झाली नाही असा अक्षेप घेतला होता. त्यावरून खैरे यांनी, पक्षात यावरून निवडणूक झाली होती. मतदान ही पार पडले होते. तर एकनाथ शिंदे कसाकाय निवडणूक घेऊ शकतो. तो फुटून गेला ना मुळ पक्षातून. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत काहीच बोलता येत नाही.

 

Published on: Jan 11, 2023 11:04 AM
RSS प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य, रहायचं असेल तर रहा; इस्लामला धोका…
हसन मुश्नीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावरही ईडीची छापेमारी