बाळासाहेब आसते तर ‘हे’ सहण केल नसतं, ऊर्दु पोस्टरवरून देसाईंची सडकून टीका

| Updated on: Mar 26, 2023 | 12:59 PM

उद्धव ठाकरे यांचे ऊर्दु भाषेतील पोस्टर लागल्याने एकच चर्चा होताना दिसत आहे. तर यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच टीका केली आहे

नाशिक : उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात सभा होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून आता सभेसाठी काहीच तास उरले आहेत. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र यापुर्वीच येथे उद्धव ठाकरे यांचे ऊर्दु भाषेतील पोस्टर लागल्याने एकच चर्चा होताना दिसत आहे. तर यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच टीका केली आहे. तर याच मुद्द्यावरून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर बाळासाहेब ठाकरे जर असते तर असे पोस्टर लागलेचं नसते असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे हे मविआमध्ये असल्याने त्यांना हे सगळं सहन करावं लागत आहे. पण जर आज ठाकरे यांचे उर्दू भाषेत बॅनर्स लावलेलं बाळासाहेब यांना सहन झालं नसतं असेही देसाईं यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 26, 2023 12:59 PM
आमचा बुलंद आवाज दाबण्याचा सत्ताधीशांनी कितीही प्रयत्न केला तरी…; रोहित पवार यांचं सूचक ट्विट
दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे वाद चिघळला; उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी मालेगावात हालचाली वाढल्या