“आमची लढाई हुकुमशाहीविरोधात”, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 20, 2023 | 8:24 AM

देशातील सर्व विरोधकांची बंगळुरूमध्ये दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक महत्वाची होती. या बैठकीला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते.

मुंबई, 20 जुलै 2023 | देशातील सर्व विरोधकांची बंगळुरूमध्ये दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक महत्वाची होती. या बैठकीला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधिमंडळातील कामासंदर्भात आले होते. यावेळी उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विरोधकांची आघाडी, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ क्लिप आदी मुद्यांवर प्रश्न विचारले. यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ पाहा…

Published on: Jul 20, 2023 08:23 AM
कोल्हापुरात पावसाची संततधार; पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर
नागपूरमध्ये पावसाचा कहर, पाण्याचा नाही राखेचा पूर; राख युक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात