छोटा राजनला सीबीआयचा दणका; सावंत याचे सिंगापूरमधून प्रत्यारपण
सावंत याला सिंगापूरमधून प्रत्यारपण करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला आधी सीबीआय ताब्यात घेईल, असे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंत सिंगापूरमध्ये हॉटेल व्यवसायाच्या मागून छोटा राजनसाठी काम करायचा
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा साथीदार आणि त्याचा फायनान्स हँडलर संतोष महादेव सावंत उर्फ अबू सावंत याला केंद्रीय तपास यंत्रणा आणि मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. त्याला सिंगापूरमधून प्रत्यारपण करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला आधी सीबीआय ताब्यात घेईल, असे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंत सिंगापूरमध्ये हॉटेल व्यवसायाच्या मागून छोटा राजनसाठी काम करायचा. मिळालेल्या माहितीनुसार, सावंत हा गेल्या 22 वर्षांपासून राजन टोळीसाठी काम करत होता. तर सावंत राजनच्या काळ्या पैशाचा हिशेबही पाहत होते.
Published on: Apr 19, 2023 11:03 AM