रावसाहेब दानवे यांचे भन्नाट भाषण; …पण, आमदार कुचे यांचा केला प्राणी असा उल्लेख! काय कारण?

| Updated on: May 23, 2023 | 7:45 AM

दानवे पुन्हा एकदा आपल्या भन्नाट भाषणामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी, मी कुंभार आहे. एखादा माणूस माझ्या पार्टिमधून गेला तर मी रडत बसत नाही, मी दुसरे गाडगे तयार करतो.. गाडगे तयार करणे आणि सांभाळून ठेवने माझे काम आहे.

अंबड : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांचा साधेपणा आणि स्पष्ट बोलण्यामुळे ओळखले जातात. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. आता दानवे पुन्हा एकदा आपल्या भन्नाट भाषणामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी, मी कुंभार आहे. एखादा माणूस माझ्या पार्टिमधून गेला तर मी रडत बसत नाही, मी दुसरे गाडगे तयार करतो.. गाडगे तयार करणे आणि सांभाळून ठेवने माझे काम आहे. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना निवडणुकीत उभे करायचे ठरवले तेव्हा माझेच कार्यकर्ते म्हणाले आपल्या कडील बघा. …पण मी शेतकरी माणूस आहे. बाजारात जातो तेव्हा बैलाची दात पाहतो, शेपटी धरून पाहतो, पाठीवर खडा मारून पाहतो आणि म्हणून सर्व परीक्षा देऊन आणलेला नारायण कुचे हा चांगला आहे. आणि आता तुमच्या तोंडून मी ऐकतो नारायण कुचे चांगला माणूस तेव्हा मला आनंद वाटतो.

Published on: May 23, 2023 07:45 AM
राम शिंदे पुन्हा गरजले, म्हणाले, “रोहित पवार यांचं ते वक्तव्य म्हणजे…”
‘मोदी विश्वगुरू अन् पापुआ देशात त्यांचा जय’, सामनातून पुन्हा पंतप्रधान मोदींना डिवचलं