भाजपला पंकजा मुंडे सोडचिठ्ठी देणार काय?; रामदास आठवले म्हणतात, ‘त्या…’

| Updated on: Jun 28, 2023 | 8:00 AM

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने त्याच्याबाबतीत आता उलट सुलट चर्चांना उत आला आहे. तर त्या बीआरएसमध्ये जाणार अशी चर्चा होताना दिसत आहे.

नगर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडून थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने त्याच्याबाबतीत आता उलट सुलट चर्चांना उत आला आहे. तर त्या बीआरएसमध्ये जाणार अशी चर्चा होताना दिसत आहे. त्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या वृत्तात तथ्य नाही असं म्हटलं आहे. तसेच पंकजा मुंडे नाराज नाहीत. तर बीआरएसला महाराष्ट्रात यश मिळणार नाही, त्यामुळे त्या बीआरएसमध्ये जाणार नाहीत. तर आज जर पंकजा मुंडे या आमदार असत्या तर त्या नक्कीच या मंत्रीमंडळात असत्या असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 28, 2023 08:00 AM
‘बात निकलेगी तो दूर तक जायेगी’!; श्रीकांत शिंदे यांचा थेट इशारा; SIT, ED लागल्याची केली टीका
‘मविआचे तुकडे कधी पडले हे कळणार सुद्धा नाही; त्यामुळेच…’; भाजप नेत्याची विरोधकांवर टीका