Video | धनंजय मुंडे आणि प्रकाश आंबडेकर यांची बीडमध्ये भेट, राजकीय चर्चांना उधान
लोकसभा निवडणूकांची तारीख लवकरच जाहीर होणार आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी ( इंडिया आघाडीत) राहणार की नाही याची निश्चिती अजून झालेली नाही. त्यातच बीडमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात पालकमंत्री आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बीड | 3 फेब्रुवारी 2024 : एकीकडे वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीशी गेले अनेक दिवस बैठकांवर बैठका सुरु असतानाही जागा वाटपाचा तिडा काही सुटत नसल्याचे समोर आले आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी आज बीड येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते कृषीमंत्री धनजंय मुंडे यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. आपण येथे वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त येथे दर्शनाला आलो असून येथे कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. आपण येथे 19 वेळा पूजेला आलो आहे. येथे आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत पुरण पोळीचे जेवण केले आहे. पुरण पोळी दूधा सोबत खायची कि तुपासोबत यावर आमची चर्चा झाल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. तर मला राजकीय चर्चा करायची असेल तर मी थेट त्यांचे बॉसच येथे येत आहेत त्यांच्याशीच करेल ना असे उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.