‘मी नक्षल्यांच्या टार्गेटवर, विरोधक म्हणून सुरक्षा का काढली? ‘या’ नेत्याचा सरकारवर निशाणा

| Updated on: Oct 29, 2022 | 9:53 AM

मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात असल्यामुळे माझी सुरक्षा काढताना सरकारने विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्याने दिली आहे.

गजानन उमाटे, नागपूरः माजी मंत्री आणि काँग्रेस नेते (Congress Leader) विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने कपात केली आहे. केवळ विरोधक म्हणून सुरक्षा काढू नये. यामुळे आमचं काम थांबेल या गैरसमजात राहू नका, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. ते म्हणाले, ‘ संबंधित व्यक्तीला मिळालेल्या धमक्या, धोका यावरून सुरक्षा (Security) प्रदान केली जाते. रवी राणांना सुरक्षा दिली. आनंद आहे. ते कुठल्या पदावर काम करतायत, हे सरकारला माहिती….
मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात असल्यामुळे माझी सुरक्षा काढताना सरकारने विचार करायला हवा होता. अर्थात सुरक्षा मिळाली तरच आम्ही काम करू शकू, असा सरकारचा समज असेल तर तो चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

 

 

 

Published on: Oct 29, 2022 09:49 AM
महाराष्ट्रात लुच्चे दिन, अन् गुजरातला…… शिवसेनेचा सामनातून शब्दबाण
नेत्यांची गुपितं अन् वसुलीच्या कहाण्या उघड करा, नार्को टेस्ट करा, भाजपच्या ‘या’ नेत्याची मागणी