देशात, राज्यात निवडणुका कधी होणार? या नेत्याने दिली ही महत्वाची माहिती

| Updated on: Sep 17, 2023 | 10:54 PM

विरोधक इतके हतबल झाले आहे की नीच शब्दाचा उपयोग करणे, निम्न शब्दाचा उपयोग करणे, विशिष्ट जाती-धर्माचे दुष्टीकरण करून जहर जहर पसरविण्याचे काम करत आहेत.

संभाजीनगर : 17 सप्टेंबर 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना जाहीर केली. मात्र, विरोधकांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही योजना जाहीर केल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्त्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत ज्या योजना जाहीर केल्या तेव्हा कुठे निवडणुका होत्या? असा सवाल केला. विरोध करणे हे विरोधकांचे काम आहे. गरिबांना या योजनेतून अधिक काम कसे मिळेल याचा विचार या योजनेतून करण्यात आला आहे. बिरबल आणि मूर्ख यांची जी काही लक्षणे सांगितली आहे. त्यातील हे लक्षण विरोधकांचे आहे. १७६ योजना सांगितल्या. त्या सर्व निवडणुका समोर ठेवून केल्या आहेत का? दर पंधरा दिवसांनी थोडी काही निवडणूक होत असते. आज आपण सप्टेंबरमध्ये आहोत तर निवडणूक मे मध्ये होणार आहेत. याचा काही मेजर परिणाम निवडणुकीत होतो का? विरोधकांकडे आता आरोप करण्याशिवाय काही शिल्लक राहिले नाही. जे पाकिस्तानला वाटतं, जे चीनला वाटतं, भारताच्या विकासाची इर्षा असणाऱ्यांना जे वाटतं तेच आता दुर्दैवाने विरोधकांना वाटतं. काही योजनांवर आधारित, विचारावर आधारित संवाद, चर्चा, वादविवाद समजू शकतो. पण असा आरोप करणे चुकीचे आहे असे ते म्हणाले.

Published on: Sep 17, 2023 10:54 PM
PM Modi Birthday | पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा; मेट्रोत मुलीनं दिल्या संस्कृतमध्ये शुभेच्छा, बघा VIDEO
मोर्चे काढा , जीआरची होळी करा, विरोधी पक्षनेते इतके का संतापले?