राऊत नाशिकमध्ये आले पण, भुकंप! काही थांबला नाही; नगराध्यक्षासह अख्खी नगरपंचायत शिंदे गटात गेली

| Updated on: Jun 05, 2023 | 10:10 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊ चौधरी यांचा हा ठाकरे गटाला जोरदार धक्का मानला जात आहे. त्यातच संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच शिंदे गटानं हा करिश्मा केल्यानं याची चर्चा राज्यभर होत आहे.

नाशिक : शिवसेनेत बंड झाल्यापासून ते आजपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरूच आहे. यात आता नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांची भर पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊ चौधरी यांचा हा ठाकरे गटाला जोरदार धक्का मानला जात आहे. त्यातच संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच शिंदे गटानं हा करिश्मा केल्यानं याची चर्चा राज्यभर होत आहे. सुरगाणा नगरपंचायतमधील विद्यमान नगराध्यक्ष भारत वाघमारे, गटनेता सचिन आहेर, नगरसेविका पुष्पा वाघमारे, नगरसेविका अरुणा वाघमारे, नगरसेविका प्रमिला वाघमारे, नगरसेवक भगवान आहेर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी या प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं.

Published on: Jun 05, 2023 10:10 AM
महाराष्ट्रात काँग्रेस अॅक्शन मोडवर, ‘या’ दोन्ही जागा काँग्रेसला मिळणार, नाना पटोले यांचं आश्वासन!
‘सकाळी उठून बदनामी करणं हा काहींचा धंदा’, संजय राऊत यांच्यावर नाव न घेता कुणाचा घणाघात