‘हे सिगारेटचे रहस्य सांगाल का?’, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना टोला

| Updated on: Oct 23, 2023 | 11:59 PM

फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या, मुंबईत प्रवेश करताच 3 ते 4 सिगारेट ओढल्यासारखे प्रदूषण आहे, याचे मोजमाप तुम्ही नक्की कसे केले? एकरी 100 कोटींच्या वांग्याचे रहस्य तर अजून समजले नाही, जरा हे सिगारेटचे तरी सांगाल का? महाराष्ट्राला हा प्रश्न पडला आहे.

मुंबई | 23 ऑक्टोंबर 2023 : महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 कोटींचे ड्रग्ज जप्त, सोलापुरातील ड्रग्जचे कारखाने उद्धवस्त, मुंबई पोलिसांकडून हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त, या बातम्या महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष गृहमंत्र्यांच्या कामाला पावती देणार्‍या आहेत. हे तुम्हाला कळतेय. पण, तुमच्यातील कुटिल राजकारणी ते कधीही तुम्हाला पटवू देणार नाही. म्हणूनच तुमची अस्वस्थता अधिक आहे अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली. सुशांतसिंग राजपूत प्रकरणावेळीही महाराष्ट्रात ड्रग्जची कारवाई मोठ्या प्रमाणात झाली होती. एनसीबीला महाराष्ट्रात यावे लागले होते. तेव्हा तुम्ही ड्रग्जवर कारवाई करणार्‍या यंत्रणांना विरोध करत होतात त्यांना नावे ठेवत होतात, असा टोलाही त्यांनी लगावला. फक्त भाषणात महाराष्ट्राची अस्मिता सांगून उपयोग नाही, तर आज आपले पोलिस दल ड्रग्जवर प्रहार करते, याचा अभिमान वाटायला हवा. ड्रग्जवर प्रहार होत असताना तुम्हाला अस्वस्थ वाटतय, असा खरमरीत सवालही त्यांनी केला.

Published on: Oct 23, 2023 11:59 PM
Dasara Melava 2023 : आव्वाज कुणाचा? ठाकरे की शिंदे यांचा? मुंबईत आज २ मोठे मेळावे अन् पोलीसही सज्ज
आशिष शेलार फस्ट्रेशनमध्ये, त्यांना थेरपीची गरज, आदित्य ठाकरे यांची जळजळीत टीका