Mumbai Goa Highway वर योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात
कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या गाडीला मागून डम्परने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाला.
मुंबई : राज्यात राजकीय नेत्यांचे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे अपघात झाले. जयकुमार गोरे उपचारानंतर घरी गेले आहेत. तर धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. यादरम्यान आता माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात झाला आहे
कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या गाडीला मागून डम्परने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाला. तर या अपघातात त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.
यानंतर सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप असून यांनी या अपघाताची चौकशी करणार असल्याचे सांगितलं आहे.
Published on: Jan 07, 2023 09:57 AM