तुम्हाला ब्रेकिंग न्यूजच द्यावी लागेल, पक्ष उमेदवाराला दिलं अपक्षाने आव्हान
विक्रम काळे, किरण पाटील की प्रदीप सोळुंके, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा कौल कुणाला? अशी चुरस निर्माण झाली असतानाच एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या पक्षाच्या उमेदवारांना थेट अपक्षांनी आव्हान दिलंय.
औरंगाबाद : मी कुणाच्या विरोधात निवडणूक लढविली नाही. पण, मला पाडायचे म्हणून जाणीवपूर्वक काही उमेदवार उभे राहिले. मी तीन वेळा आमदार असताना शिक्षकांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याच्याच आधारे मी मते मागितली, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी स्पष्ट केलं. तसेच, किरण पाटील जरी विरोधात असले तरी आमचे ध्येय एकच आहे. मतदारराजा जो कौल देतील तो आम्हाला मान्य असेल असेही ते म्हणाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादीतून बंडखोरी करत प्रदीप सोळुंके यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पण, त्यांनीही आम्ही सगळे एकत्र आहोत. मराठवाड्यातील आम्ही सुपुत्र एकत्र आहोत. लोकशाही पद्धतीनं पक्षाकडे तिकीट मागितली होती. पण, मिळाले नाही. पहिल्या फेरीत जे निकाल आले ते चुकीचे ठरतील आणि तुम्हाला मोठी ब्रेकिंग न्युज द्यावी लागेल. अपक्षाची सरशी होणार असा दावा त्यांनी केला.