जे 50 वर्षात घडलं नाही ते परभणी कृषी विद्यापीठाने यंदा करुन दाखवंल..!

| Updated on: Nov 01, 2021 | 12:42 PM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत वेगवेगळे उपक्रम सुरुच असतात. त्यामुळे मराठवाड्यातील शेती उत्पादनामध्येही फरक जाणवत आहे. पण यावेळी कृषी विद्यापीठाने जो डंका बजावला आहे त्याचे कौतुक राज्यभर होत आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत या विद्यापीठातील विविध शाखेतील 151 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे.

जे 50 वर्षात घडलं नाही ते परभणी कृषी विद्यापीठाने यंदा करुन दाखवंल..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत वेगवेगळे उपक्रम सुरुच असतात. त्यामुळे मराठवाड्यातील शेती उत्पादनामध्येही फरक जाणवत आहे. पण यावेळी कृषी विद्यापीठाने जो डंका बजावला आहे त्याचे कौतुक राज्यभर होत आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या नेट परीक्षेत या विद्यापीठातील विविध शाखेतील 151 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे. त्यामुळे बियाणे संशोधन, कृषीच्या विविध उपक्रमात विद्यापीठाचा महत्वाचा भाग राहिलेला आहे. यावेळी मात्र, जे गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात झालं नाही ते विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी करुन दाखवलेले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ यामुळे या भागातील शेतकऱ्यांना एक नवी दिशा मिळत आहे. असे असताना विद्यापीठाने वेगवेगळ्या शाखांत प्रगती केलेली आहे. विविध राज्‍यांतील कृषी विद्यापीठे तथा कृषी महाविद्यालयातील सहायक प्राध्‍यापक व समकक्ष पदाकरिता राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत 151 विद्यार्थ्यांचे यश

राष्‍ट्रीय पात्रता परीक्षेत परभणी कृषी महाविद्यालयाच्या 85 यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कृषी विद्या विषयाचे 29, कृषी हवामानशास्‍त्र 12, कृषी कीटकशास्त्र 11, विस्‍तार शिक्षण 10, कृषी वनस्पतिशास्त्र 8, मृद्‌विज्ञान व रसायनशास्‍त्र 5, उद्यानविद्या 4, कृषी अर्थशास्‍त्र 4, वनस्‍पती रोगशास्‍त्र 2 विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. तर लातूर कृषी महाविद्यालयाच्या 34 विद्यार्थ्यांमध्ये कृषी कीटकशास्त्र विषयाचे 15, कृषिविद्या 11, मृदा विज्ञान व रसायनशास्‍त्र 4, कृषी वनस्पतिशास्त्र 2, कृषी अर्थशास्‍त्र 1, उद्यानविद्या 1 विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. बदनापूर कृषी महाविद्यालयाच्या 12 विद्यार्थ्यांमध्ये कृषिविद्या विषयाचे 8 तर कृषी कीटकशास्त्र 4 विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे.

इतर परिक्षांमध्येही विद्यापीठाचा डंका

151 पैकी तीन विद्यार्थी हे कृषी संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षेत उत्‍तीर्ण झाले आहेत. परभणी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे 16 विद्यार्थी नेट परीक्षेत उत्‍तीर्ण झाले असून विद्यापीठाच्या इतिहासात प्रथम एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेले आहे. त्यामुळे विविध कृषी संशोधना बरोबरच विद्यापीठाचा शैक्षणिक स्तरही उंचावलेला आहे. त्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. (151 students of Marathwada Agricultural University pass net examination, )

सुवर्ण महोत्सवी वर्षातील हे यश अभिमास्पद

राष्ट्रीय पातळीवरील या परीक्षेत मिळालेल्या यशामुळे विद्यापीठाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा बदलला गेला आहे. 151 विद्यार्थ्यांचे यश ही मोठी अभिमानाची बाब आहे. शिवाय सुवर्ण महोत्सवी वर्षात हे यश मिळाल्याने अधिकचा आनंद होत आहे. गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात जे झाले नाही ते यंदा करुन दाखवल्याचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

कर्जमाफीसाठी ही शेवटची संधी, प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा कर्जबाजारीपणाचा शिक्का कायम राहणार..!

जे खरीपात झालं नाही ते रब्बीत होईल का ? शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनाची संधी

शेतकऱ्यांशी दुजाभाव, 64 साखर कारखानदारांची दिवाळी कडवट