नाशिक : बळीराजावर एका मागून एक संकट येतच आहे. कधी आस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट आल्याने बळीराजा ( Farmer News ) पुरता हवालदिल होत असतो. त्यामध्ये आता नाशिकच्या एका शेतकऱ्यावर आलेले संकट अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे हृदयद्रावक ( Crying Farmer ) घटना घडली आहे. शेतात घर बांधून राहत असलेले कैलास घोटेकर यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिले आहे. मध्यरात्रीच्या वेळी अचानक जनावरे जोर जोरात ओरडू लागल्याने घोटेकर कुटुंब घराच्या बाहेर आले होते. त्यांच्या समोर जे दृश्य होते ते पाहून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
उन्हाळा असतांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यासाठी शेतकरी पावसाळ्यातील पिकांपासून चारा तयार करत आणि त्याची साठवणूक करतात. अशाच स्वरूपाची साठवणूक कैलास घोटेकर यांनी केली होती.
कैलास घोटेकर हे मळ्यात राहतात, घराच्या बाजूलाच जनावरांचा गोठा आहे. तिथेच त्यांनी जनावरांसाठी चारा म्हणून सोयाबीन आणि मकाचा भुसा ठेवला होता. आणि बाजूलाच जनावरे बांधत असतात.
मात्र, मध्यरात्रीच्या वेळी चाऱ्याला मोठी आग लागली. यामध्ये बाजूलाच असलेली जनावरे जोरजोरात ओरडू लागली होती. त्यामुळे घोटेकर कुटुंब बाहेर आले आणि बघताच गोठयातून आगीचे लोळ बाहेर पडत होते.
कुटुंबाने आग विझवून जनावरे त्यातून बाहेर काढले. पण यामध्ये 7 जनावरे होरपळली आहे. 30 ते 40 टक्के जनावरे भाजले गेले आहे. यामध्ये सहा मोठे जनावरे आहेत. तर एक वासरू आहे.
आगीची घटना खरंतर रात्रीची वेळ असल्याने उशिरा लक्षात आली होती. त्यामध्ये आगीच्या वाफेने जनावरी चांगलीच भाजली गेली असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले आहे.
जोरजोरात ओरडणारे पशूधन बघू अनेकांना रडू कोसळल आहे. घोटेकर कुटुंबाचा तर अक्षरशः अश्रूंचा बांध फुटला आहे. त्यामध्ये पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशूधनावर उपचार केले आहे.
आगीत भाजलेल्या जनावरांना मलम लावण्यात आला आहे. काही इंजेक्शन देण्यात आले आहे. त्यामध्ये वेदनाशामक प्रतिजैविके, व्हिटॅमिन्सचे इंजेक्शन आणि सलाईन दिल्या आहेत.
याप्रकरणी घोटेकर कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. लाखों रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन मदत करण्याची मागणी होऊ लागली आहे. गावपातळीवर पंचनामा करून मदत होईल अशी अपेक्षा आसपासच्या शेतकऱ्यांना आहे.
शेतीमालाला अगोदरच भाव नाही, त्यातच असं दुसरं संकट निर्माण झाल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे आर्थिक मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे गावातील दुर्दैवी घटना अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.