AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवा गुणवत्ता निर्देशांक - (AQI) आज

Mumbai
164 Aqi range: 151-200
Good
050
Moderate
100
Poor
150
Unhealthy
200
Severe
300
Hazardous
500+
Air Quality Is
Unhealthy
PM 2.5 76
PM 10 94
Last Updated: 14 December 2025 | 10:28 AM

सर्वाधिक प्रदूषित शहर

रँक शहर AQI
1Ghaziabad708
2Begampur669
3Khawaja Bagh669
4Noida668
5Ganganagar665
6New Delhi656
7Sonipat655
8Baghpat634
9Sri ganganagar629
10Faridabad627

सर्वात कमी प्रदूषित शहर

रँक शहर AQI
1Kohima46
2Shillong46
3Gangtok51
4Darjeeling52
5Ootacamund56
6Damoh56
7Ooty56
8Kodaikanal60
9Lansdowne68
10Shamshi73

वायू गुणवत्ता निर्देशांक मापनश्रेणी

  • 0-50 AQI
    good
  • 51-100 AQI
    Moderate
  • 101-150 AQI
    Poor
  • 151-200 AQI
    Unhealthy
  • 201-300 AQI
    severe
  • 301-500+ AQI
    Hazardous

FAQ’S

आज Mumbai चे AQI काय आहे?

Mumbai मध्ये AQI 164 पर्यंत पोहोचला आहे, तो ( Unhealthy ) वायु गुणवत्तेची स्थिती दाखवतो, त्याचे मुख्य कारण PM2.5 आणि PM10 सारख्या प्रदूषकांमधील वाढ आहे.

काल Mumbai AQI काय होता?

13 दिसंबर Mumbai AQI 185 वर पोहोचला, तो(Unhealthy) वायु गुणवत्तेची स्थिती दाखवतो.

खराब हवा आरोग्यावर कशी परिणाम करते?

प्रदूषित हवा आरोग्यावर गंभीर नकारात्मक प्रभाव पाडते. खासकरून हवेत पीएम 2.5, पीएम10, सल्फर डायऑक्साइड, नाइट्रोजन ऑक्साइड आणि ओझोन सारखे हानिकारक तत्त्वे असतील तर.

श्वसन तंत्रावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फुफ्फुसात जळजळ, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो. दमा आणि ब्रोंकायटिस सारखे आजार वाढतात. दीर्घकाळ प्रदूषणात राहिल्यावर क्रॉनिक आब्सट्क्टिव्ह पल्मोनरी डिसिज (COPD) होऊ शकते. हानिकारक कण रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

दीर्घकाळ प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो. प्रदूषणातील विषारी कण मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे डोकेदुखी, चिडचिड आणि नैराश्य येऊ शकते. काही संशोधनानुसार, हे स्मृती आणि संज्ञानात्मक क्षमतेवर नकारात्मक परिणाम घडवतात.

गर्भवती महिलांमध्ये प्रदूषित हवेमुळे गर्भातील शिशूच्या विकासावर नकारात्मक परिणाम पडू शकतो. मुलांच्या फुफ्फुसांचा विकास धीम्या गतीने होऊ शकतो आणि श्वसनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. प्रदूषित हवा त्वचेला जळजळ, खाज आणि अ‍ॅलर्जीचं कारण बनू शकते. डोळ्यात जळजळ, डोळ्याच्या खाली लालचट्टा येणे आणि डोळ्यांमधून पाणी येण्याची समस्या उद्भवू शकते.

दीर्घ काळापर्यंत हवा प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. प्रदूषित हवेचा आरोग्यावर दीर्घकालिन गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आयुष्याची गुणवत्ता आणि आयुर्मान कमी होऊ शकते. त्यापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे, इनडोअर एअर प्युरिफायरचा वापर आणि प्रदूषणापासून वाचण्याचे उपाय करणे आवश्यक आहे.

हवा प्रदूषित झाल्याने काय केलं पाहिजे?

अत्याधिक प्रदूषणाच्यावेळी (विशेषकरून सकाळी आणि संध्याकाळी उशिरा) बाहर जाणं टाळा. बाहेर जाणं आवश्यकच असेल तर N95 वा P100 सारख्या गुणवत्तेचे मास्क वापरा. इनडोअर राहून व्यायाम करा आणि बाहेरच्या वातावरणापासून दूर राहा. खासकरून लहान मुलं आणि ज्येष्ठांनी सावध राहावे. प्रदूषित हवा येऊ नये म्हणून खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. खासकरून झोपण्याच्या आणि काम करण्याच्या ठिकाणी घरी आणि ऑफिसात नवीन एअर प्युरिफायर लावा. एअर प्युरिफायर खरेदी करताना HEPA फिल्टर असणाऱ्या उपकरणांना प्राधान्य द्या. श्वास घेण्यास त्रास होत असेल, खोकला असेल किंवा छातीत दुखत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. जास्तीत जास्त पाणी प्या आणि आहारात अँटीऑक्सिडेंट्स युक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करा. उदा- आंबे, संत्री आणि पालक.

एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) चेक करण्यासाठी अॅप्स वा वेबसाइट्सचा वापर करा. त्यानुसारच तुमची दिनचर्या तयार करा. घरात धूळ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी नियमित साफसफाई करा. इनडोअर रोपं जसे की स्नेक प्लांट आणि पीस लिलीचा वापर करा. त्या हवा शुद्ध करण्यात मदत करतात. कारपुलिंग करू नका, सार्वजनिक परिवहन सेवेचा लाभ घ्या किंवा इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्या. बाहेरून आल्यावर चेहरा, हात आणि नाक स्वच्छ धुवून काढा. मास्क आणि कपडे नियमित स्वच्छ करा.

PM 2.5 आणि PM10 लेव्हलमध्ये का अंतर आहे.?

PM 2.5 आणि PM 10 हे हवेमध्ये आढळणारे कणीय प्रदूषक (Particulate Matter) आहेत, जे प्रदूषणाचे मुख्य घटक मानले जातात. या दोघांमधील मुख्य फरक त्यांच्या आकार, स्रोत (उगम) आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमध्ये आहे. PM 10: याचा व्यास 10 मायक्रॉन किंवा त्याहून कमी असतो. तर PM 2.5: याचा व्यास 2.5 मायक्रॉन किंवा त्याहून कमी असतो. त्यामुळे PM 2.5 हे PM 10 पेक्षा अधिक सूक्ष्म आणि धोकादायक असते.

स्त्रोतांनुसार सांगायचं तर, PM 10 रस्त्यावरील धूळ, बांधकामाचे काम, परागकणातून (pollen) निर्माण होतात. तर PM 2.5 वाहनांचा धूर, कडबा जाळणे आणि औद्योगिक उत्सर्जनातून निर्माण होतो. आरोग्यावरील प्रभाव पाहता, PM 10 मुख्यतः नाक, घसा आणि वरच्या श्वसन मार्गावर परिणाम करतो. तर PM 2.5 फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊन रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतो. त्यामुळे हे हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजार निर्माण करू शकते.

PM 2.5 हवेत दीर्घकाळ राहते. ते स्मॉग (धुरकट धुके) तयार करण्यामध्ये मोठी भूमिका बजावते. त्यामुळे PM 2.5 चा मानव आरोग्यावर अधिक गंभीर परिणाम होतो.