सिंधुदुर्ग : येथील (Wayangani) वायंगणी (Beach) समुद्रकिनाऱ्यावर सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे नव्या प्रजातीच्या (Turtle) कासवाची. कासवप्रेमींसाठी ही एक वेगळी बाब असून ऑलिव्ह रिडले” आणि “ग्रीन टर्टल” चे संकरित गुणधर्म असलेली नव प्रजातीचे दर्शन घडून आले आहे. एकीकडे कासवाची संख्या घटत असतानाच हा प्रकार समोर आला आहे. ऑलिव्ह रिडले” आणि “ग्रीन टर्टल” चे संकरित गुणधर्म असलेल्या या कासवांना वायंगणी नाव द्यावे अशी मागणी येथील कासवप्रेमींकडून होत आहे.वेंगुर्ले, येथील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर “ऑलिव्ह रिडले” आणि “ग्रीन टर्टल” या दोन्ही प्रजातींचे एकत्र जनुकीय गुणधर्म असणारी नवी प्रजाती आढळून आली आहे. कासवाच्या या जनुकीय बदलांमुळे एक नवी प्रजाती समोर येण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गातील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव्या कासवाची प्रजाती आढळून आली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर या नव्या प्रजातीचा संशोधकांकडून अभ्यास व्हावा अशी मागणी सुहास तोरस्कर यांनी केली आहे. शिवाय गेल्या 20 वर्षापासून या किनाऱ्यावर कासवांचे संवर्धन व्हावे यासाठी ते काम करीत आहेत. या नव प्रजातीला समुद्रकिनारी असलेल्या वायंगणी या गावाचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे गावाला वेगळी ओळख निर्माण होणार आहे. 20 वर्षाची मेहनत आता कामी येऊ लागली असून कासवांचे संवर्धन केल्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे मेहनतीचे फळ आणि गावाला वेगळी ओळख याचा विचार करुन नाव देण्याची त्यांची मागणी आहे.
काळाच्या ओघात कासवांची संख्या ही झपाट्याने घटत आहे. केवळ समुद्रकिनारी ते देखील कमी प्रमाणात कासव आढळून येतात. नवीन प्रजातीचे कासव हे ग्रीन टर्टल आणि ऑलिव्ह रिडले या दोघांचे गुणधर्म असलेला नवीन प्रकारचे आहे. ही कोणती नवीन प्रजाती आहे याचे कुतुहूलही असल्याचे तोरस्कर यांनी सांगितले आहे. याचं संशोधन होऊन त्याला वायंगणी गावाचं नाव द्यावं अशी मागणी त्यांनी केली. तसेच गावात कासवांचं संग्रहालय व्हावे, कासव संवर्धन केंद्र करावं आदी मागणीही त्यांनी केली.
Onion Rate : कांदा दराचा वांदा मिटणार! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची काय आहे रणनिती?
Prices of Pulses : डाळींचे दर शंभरीपार, उत्पादनात घट त्यात महागाईचा तडका