पुणे : यंदा साखर उत्पादनाला पोषक वातावरण आहे. देशात (Sugar Production) साखरेचे उत्पादन 150 लाख टनापेक्षा अधिक झाले आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन झाले असून गाळप हंगाम जोमात सुरु आहे. हे सर्वकाही असले तरी राज्यात आणि देशात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. ऊसाचे क्षेत्र हे वाढले असून (Marathwada) मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही ऊस तोडणी रखडलेली आहे. यंदा यंत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असला तरी लागवड करुन तोडणीचा कालावधी संपूनही तोड झालेली नाही. त्यामुळे ऊसाला तुरे लागले आहेत. पण या तोडणी राहिलेल्या (Sugarcane Area) ऊसाच्या क्षेत्राची मोजणी आता उपग्रहाच्या मदतीने केली जाणार आहे. यासंबंधीचा अहवाल जानेवारी महिन्याअखेरीस केला जाणार असल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सध्या साखरेचा हंगाम हा मध्यावर आलेला आहे. यंदा साखर उत्पादनासाठी सर्वकाही पोषक असले तरी अतिरिक्त लागवड केलेल्या ऊसाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही दिवसेंदिवस वाढत आहे. उत्पादनाच्या दृष्टीने यंदा क्षेत्रात वाढ झाली होती. त्यानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे पण तोडणी राहिलेल्या ऊसाचे काय हा सवाल कायम आहे. म्हणूनच ‘इस्मा’ च्या माध्यमातून शिल्लक ऊसाचे क्षेत्र किती आहे याची मोजणी होणार आहे. याकरिता ऊस शेतीच्या उपग्रह प्रतिमा काढण्यात येणार आहेत. याबरोबरच विविध भागातून संबंधित यंत्रणेकडून आकडेवारीही घेण्यात येणार आहे. त्यामुळे ऊस तोडणीचा किती शिल्लक आहे याचा अंदाज बांधता येणार आहे.
लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते व त्यामधील ग्लुकोज व फ्रुक्टोजचे विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच. शिवाय तोडणीला येऊनही दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तर मात्र, ऊस फडातच राहणार अशी भीती असते.
सध्या ऊसाचा गाळप हंगाम मध्यावर आहे. असे असले तरी गावोगावी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहेच. त्यामुळे हंगाम जोमात सुरु असतानाच किती ऊस तोडणीचा शिल्लक आहे याचा आढावा घेतला जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीसपर्यंत राज्यात तसेच देशात किती ऊस शिल्लक आहे याचा आढावा घेतला जाणार असून त्यानुसार तोडणीचे नियोजन केले जाणार आहे.
ही कसली दुश्मनी ? 35 एकरातील साठवलेल्या तुरीच्या गंजीची अज्ञातांकडून होळी, लाखोंची नुकसान
Positive News: तीन महिन्यात 150 लाख टन साखरेचे उत्पादन, महाराष्ट्राचा किती वाटा ? वाचा सविस्तर
Rabi Season : वातावरण निवळले, शेतकऱ्यांनो लागा कामाला, पीक संरक्षणासाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?