तयारी आगामी खरीप हंगामाची, कसे केले जाते बीजोत्पादन?

| Updated on: Nov 18, 2021 | 5:43 PM

उत्पादन क्षमता वाढावी तसेच शेतकऱ्यांना प्रमाणित व पायाभूत बियाणे मिळावे या करिता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडाळाकडून बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेतला जातो. त्याअनुशंगाने खरीप 2022 करीता सोयाबीन पिकाची निवड करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या बियाणाची पूर्तता करण्याचे राज्य सरकारचे नियोजन असते.

तयारी आगामी खरीप हंगामाची, कसे केले जाते बीजोत्पादन?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : उत्पादन क्षमता वाढावी तसेच शेतकऱ्यांना प्रमाणित व पायाभूत बियाणे मिळावे या करिता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडाळाकडून बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेतला जातो. त्याअनुशंगाने खरीप 2022 करीता सोयाबीन पिकाची निवड करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या बियाणाची पूर्तता करण्याचे राज्य सरकारचे नियोजन असते. त्यामुळे उन्हाळी 2021-22 हंगामामध्ये MASU-612, MASU- 158, MASU162, MASU-71, फुले संगम, फुले किमया या वाणाचा पायाभूत दर्जाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

महामंडळाच्यावतीने हा कार्यक्रम 15 जानेवारी 2022 च्या आगोदर राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. या संदर्भात इच्छूक बीजोत्पादकांना बियाणे स्त्रोत, किंमत, उन्हाळी 2021-22 हंगामातील महामंडाळाचे सोयाबीन बीजोत्पानाचे खरेदी धोरण यासंदर्भात जिल्हा महाबीज कार्यालयात माहिती उपलब्ध राहणार आहे.

बीजोत्पादन करताना काय काळजी घ्यावी लागते?

हंगामापूर्वी केले जाणारे बीजोत्पादनावरच त्या हंगामातील उत्पादनक्षमता ही अवलंबून असते. त्यामुळे योग्य काळजी घेतली तरच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही वाणाची वाणाची उत्पादन क्षमता ही त्याच्या अनुवंशिक गुणधर्मावर आधारीत असते. त्यामुळे उत्पादन क्षमता पिढ्यानिपढ्या टिकून ठेवायची असेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असू नये हे सर्वात महत्वाचे आहे. बियाणामध्ये भेसळ ही पेरणी, काढणी, मळणी व पिशवीत भरण्यापूर्वी कधीही होऊ शकते. त्यामुळे 100 टक्के भेसळ टाळून बीजोत्पादन करणे महत्वाचे आहे.

पेरणीसाठी बियाणे : बीजोत्पादनासाठी योग्य त्या प्रकारचे बियाणे निवडावे म्हणजेच पायाभूत बीजोत्पादनासाठी मूलभूत तर प्रमाणीत बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावे लागणार आहे. बियाणे खरेदी करताना बीजप्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणीत केलेले बियाणे हे कृषी विद्यापाठातूनच खरेदी करावे व त्याची पावती घ्यावी.

क्षेत्राची निवड : ज्या क्षेत्राची निवड करायची आहे त्या क्षेत्रात मागील हंगामात ते पिक घेतलेले नसावे. निवडलेली जमिन सुपिक सपाट व पाण्याचा निचरा होणारी असावी शिवाय ओलीताची सोय असणे गरजेचे आहे.

विलगीकरण : बीजोत्पादन घेण्यासाठी आलेल्या वाणामध्ये त्याच पिकाच्या इतर वाणामध्ये भेसळ होऊ नये म्हणून विशिष्ट अंरावरच हे पीक वेगळे ठेवावे लागणार आहे. यालाच विलगीकरण अंतर असे म्हणतात.

पेरणी करताना घ्यावयाची काळजी

पेरणीसाठी बियाणांची पिशवी उलट्या बाजूने फोडावी, पिशवीवरील खूण, चिट्ठी याच्यासह बियाणाचा नमुना जपून ठेवावा. ज्यामुळे बियाणे सदोष आढळल्यास जपून ठेवलेले बियाणे नमुन्यांची उगवण क्षमता चाचणी घेणे शक्य होणार आहे. बीजप्रक्रिया झाल्यानंतर बियाणे बीज परीक्षणात पास झाल्यावर ते योग्य आकाराच्या पिशव्यात भरुन त्यास बीजप्रमाणीकरण यंत्रणेचे प्रमाणपत्र लावले जाते. असेच बियाणेच पेरणीसाठी वापरल्यास उत्पादनात वाढ होते.

असे मिळावावे प्रमाणीत बियाणे

बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आधार कार्ड, बॅंक पासबूकची झेरॅाक्स ही जिल्हा महाबीज कार्यालयात जमा करावे लागणार आहे. त्यानंतरच आरक्षण करुन घेतले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

पोल्ट्री ब्रीडर्सच्या भूमिकेवरुन रणकंदन, तर चिकन आयातीची परवानगी द्या : पाशा पटेल

ज्याच्यावर भिस्त ‘ते’ खरिपातील पिकही धोक्यात, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी

कारखानदारांचा अजब दावा, म्हणे, शेतकऱ्यांच्या काळजीपोटीच विनापरवाना पेटवली कारखान्याची धुराडी