नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून प्रमुख दूध उत्पादक संस्था अमूल आणि आणि पेटा या संघटनेमध्ये वेगन दूध निर्मितीवरुन वाद सुरू आहे. दूध उत्पादन क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या अमूल कंपनीचे व्हाईस चेअरमन वालमजी हंबाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पेटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पेटा ची भूमिका भारतीय दुध उत्पादकांच्या प्रतिमेला तडा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. (Amul Vice Chariman Valamji Humbal urged to PM Narendra Modi to ban NGO PETA)
अमूलच्या उपाध्यक्षांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताच्या विकासदरामध्ये दूध उत्पादक किंवा दूध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. दूध व्यवसायाबद्दल पसरविण्यात येत असलेल्या गैर समजामुळे भारताच्या जीडीपीला मोठा धक्का बसेल, असं म्हटलं आहे. भारतातल्या दूध व्यवसाय विषयी जागतिक पातळीवर कट कारस्थान सुरू आहेत. भारतीय दूध व्यवसायिकांची प्रतिमा खराब करण्याचा डाव असल्याचे देखील वालमजी हंबाल यांनी म्हटलं आहे.
काही संस्था भारतीय दूध उत्पादक आणि व्यवसायाबद्दल गैरसमज प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न थांबवावा, त्या संस्थांवर कारवाई करण्यात यावी. पेटावर बंदी घालावी, त्यांच्यावर कारवाई करावी. दूध व्यवसायिकांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणे त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे असा प्रकार सुरू आहे असं वालमजी हंबाल यांनी म्हटलं.
हंबाल पुढे म्हणाले की, भारतातील 10 कोटी दूध उत्पादकांचा हा प्रश्न आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी याबाबत पेटा या संस्थेवर बंदी घालावी. पेटा संस्थेने तीन दिवसांपूर्वी अमूल या संस्थेला वेगन दूध तयार करण्यासंबंधी पत्र लिहिले होते. यावरुन दोन्ही संस्थामध्ये वाद सुरु झाला. भारतीय शेतकरी पाळीव प्राण्यांना त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणे जपतो, त्यांची काळजी घेतो. त्यांचा कोणताही छळ केला जात नाही. चुकीच्या माहितीवर भारतीय दूध व्यवसाय बद्दल गैरसमज पसरवले जात आहेत, असं वालमजी हंबाल म्हणाले.
भारतीय दुग्ध व्यवसाय भारताची गरज भागवण्यासाठी स्वयंपूर्ण आहे. या व्यवसायातून दहा कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतोय. भारतीय दूध व्यवसायाबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या संस्थावर कारवाई करावी यासाठी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच अमोल 40 लाख शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार आहेत, असं वालमजी हंबाल यांनी सांगितलं.
ग्राहकांची वेगन दूध खरेदी करण्याची मानसिकता आहे. वेगन दूधाच्या पदार्थांना मागणी आहे. दूध संस्थानी बाजारपेठेतील बदलांचा स्वीकार करावा, असं पेटाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. वेगन दूध सोया, नारळ, काजू इत्यादीपासून बनवलं जाते.
राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या गावाला मिळणारी बक्षीस रक्कम तब्बल… https://t.co/0ZfzXdnyG1 @mrhasanmushrif | #CoronafreeVillage | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2021
हेही वाचा
राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या गावाला मिळणारी बक्षीस रक्कम तब्बल…
कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींसह चौघी बुडाल्या, तिघींचा अंत
(Amul Vice Chariman Valamji Humbal urged to PM Narendra Modi to ban NGO PETA)