मुंबई : थंडीच्या दिवसांमध्ये (Winter) जनावरांना लाळ्या खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण होत असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण आणि टॅगिंग हे केले जाते. यंदा कोरोनामुळे (Corona) राज्यातील अनेक ठिकाणचे बाजार हे बंद होते त्यामुळे या मोहिमेला खंड पडला होता. आता हिवाळा सुरु होण्यापूर्वी या लसीकरणाला सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हे लसीकरण आणि टॅगिंग केले जात आहे. या दरम्यान, लसीकरण तर केले जात आहे. शिवाय पशुपालकांना घ्यावयाच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केले जात आहे. संबंधित विभागाने एका महिन्याच्या आतमध्ये हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
लाळ्या-खुरकूत हा संसर्गजन्य रोग आहे. ऐन हिवाळ्यात याची लागण जनावरांना होत असते. राज्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने या लसीकरण मोहिमेला खंड पडला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झाला आहे. शिवाय 10 दिवसांनी राज्यातील साखर कारखाने हे सुरु होत असून कारखान्यावर येणाऱ्या जनावरांचे लसीकरण व टॅगिंग करण्याच्या सुचना साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला या सुचना करण्यात आलेल्या आहेत.
* खुरकुताची लागण झाली की जनावर हे शांत राहते नियमितपणे चारा खात नाही पाणी पिणे बंद करते तर दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी होते.
* या दरम्यानच्या काळात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात तर गाभण जनावराच्या मागच्या पायात हे फोड आले तर अपंगत्वसुध्दा येऊ शकते.
* आजही ग्रामीण भागात जनावराने अधिकची लाळ गाळली तर चप्पल जीभेवर घासली जाते. मात्र, असे न करता जर या आजाराची साथच सुरु असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. किंवा ज्या जनावराला आजार झाला आहे त्याच्या शेजारी निरोगी जनावर हे बांधू नये किंवा त्याचा चाराही त्याला देऊ नये कारण लाळ्या आजार हा लाळेपासूनच पसरतो.
* लाळ्या खुरकत झालेल्या जनावरांपासून निरोगी जनावरे ही वेगळी बांधणे आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता त्याची स्वतंत्र सोय करावी
* ज्या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी.
* जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत. भांड्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल.
* जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यता होत नाही.
* लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणासाठी लसीकरण हे सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे.
हिवाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात होते. मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे इतर जनावरांनाही याची लागण होते. शिवाय काळजी घेताना लहान बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने या आजाराची तीव्रताही वाढत जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी लसीकरण आणि योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. (Animal vaccination begins, animal husbandry should take care of infectious diseases)
वटाण्याचे हलक्या जमिनीत भरघोस उत्पादन, यंदा पोषक वातावरणही, जाणून घ्या लागवड पध्दत अन् सर्वकाही
बाजारभाव : उडदाचे दर वधारले, सोयाबीनबाबत मात्र, चिंता कायम
20 हजार कोटी रुपये अदा केले, मात्र 500 कोटींमुळे अर्धवट राहिली ‘महाविकास आघाडी’ची पीक कर्जमाफी