Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे वाढले दर, सोयाबीनचे काय चित्र?

| Updated on: Mar 16, 2022 | 2:56 PM

'नाफेड' च्या माध्यमातून राज्यभर हरभरा पिकासाठी हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली आहेत. हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडे पर्यायच नसल्याने अनेकांनी खुल्या बाजारपेठेत कमी किमंतीने हरभऱ्याची विक्री केली. मात्र, आता शासकीय हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल राहिलेला आहे. नोंदणी आणि प्रत्यक्ष विक्रीला सुरवात होताच खुल्या बाजारपेठेतले चित्र बदलले आहे. आतापर्यंत हरभऱ्याला 4 हजार 500 पेक्षा अधिकचा दर बाजारपेठेत नव्हताच मात्र, हमीभाव केंद्र सुरु होताच 200 रुपायांनी हरभरा दरात सुधारणा झाली आहे.

Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे वाढले दर, सोयाबीनचे काय चित्र?
हरभरा खरेदी केंद्र
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लातूर : ‘नाफेड’ च्या माध्यमातून (Maharashtra) राज्यभर हरभरा पिकासाठी हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली आहेत. हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडे पर्यायच नसल्याने अनेकांनी खुल्या बाजारपेठेत कमी किमंतीने (Chickpea Crop) हरभऱ्याची विक्री केली. मात्र, आता शासकीय हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल राहिलेला आहे. नोंदणी आणि प्रत्यक्ष विक्रीला सुरवात होताच खुल्या बाजारपेठेतले चित्र बदलले आहे. आतापर्यंत हरभऱ्याला 4 हजार 500 पेक्षा अधिकचा दर बाजारपेठेत नव्हताच मात्र, हमीभाव केंद्र सुरु होताच 200 रुपायांनी हरभरा दरात सुधारणा झाली आहे. शेतकऱ्यांकडे सक्षम पर्याय असल्याने बाजारपेठेतील आवक कमी होऊन खरेदी केंद्राचा आधार घेण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तर दुसरीकडे (Soybean) सोयाबीनचे दर हे 7 हजार 250 रुपयांवरच स्थिरावले आहेत. सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, हरभरा आणि तुरीची आवक सुरु आहे. हरभरा वगळता इतर शेतीमालाचे दर हे स्थिर आहेत.

हरभरा पिकांचे कसे बदलतेय स्वरुप?

यंदा उन्हाळी हंगामात विक्रमी क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादनात भर पडणार आहे शिवाय यासंदर्भात कृषी विभागाने अंदाजित उत्पादकता ही जाहीर केली आहे. वाढत्या उत्पादनात शेतकऱ्यांना मोठा आधार असणार आहे तो हमीभाव केंद्राचा. आतापर्यंत शेतकरी खुल्या बाजारपेठेत विक्री करीत होता अजूनही हरभऱ्याची आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 30 हजार पोत्यांचीच आहे. पण दुसरीकडे खरेदी केंद्राकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कारण खुल्या बाजारात 4 हजार 700 तर खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी होताच खुल्या बाजारातील दर 200 रुपयांनी वाढलेले आहेत.

सोयाबीनची आवक अन् दरही स्थिरच

दोन दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरात 50 रुपयांची घट झाल्यानंतर 7 हजार 250 रुपयांवर सोयाबीन स्थिरावले आहे. गेल्या 15 दिवसांपासून हीट स्थिती आहे. तर लातूर मार्केटला दिवसाकाठी 20 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. शेतकऱ्यांनी साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी काढले असले तरी ते पूर्णपणे विकतील अशी स्थिती नाही. कारण अजूनही शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळालेला नाही.

तुरीच्या दरातही वाढ

खरीप हंगामातील तुरीची आवक सुरु झाली असली तरी त्याचे प्रमाण हे कमी आहे. राज्यातील 32 जिल्ह्यामध्ये तुरीचे खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. हंगामाच्या सुरवातीला खुल्याबाजारात तुरीचे दर घसरले होते पण खरेदी केंद्र सुरु झाल्यापासून दर वाढले होते. तीच परस्थिती आता हरभरा पिकासाठी निर्माण होणार का अशी परस्थिती निर्माण होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural : शेतीला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, शेतकरी आत्मनिर्भरतेसाठी सरकारचे काय आहे धोरण?

काय सांगता ? 11 वर्षापूर्वी मयत झालेला व्यक्ती थेट रोजगार हमी योजनेवर, अमरावतीमध्ये अनियमितेची ‘हमी’

Lasalgaon Market : कांद्याला उतरती कळा, हजाराच्या आतमध्येच दर, अतिरिक्त उत्पादनाचे करायचे काय?