लातूर : लाळ्या-खुरकूत (Impact on infection of animals) हा संसर्गजन्य रोग आहे. थंडीला सुरवात झाली की या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय आजही शेतकरी पशूधनाची योग्य काळजी घेत नसल्याने हा आजार वाढत आहे. आतापर्यंत (immunization important) लसीकरण, पशु संवर्धन विभागाकडून राबण्यात आलेल्या उपाययोजना हे सर्व ठिक होते पण आता हा आजार शेतामधील गोठ्यातील जनावरांपर्यंत पोहचलेला आहे. मात्र, लसीकरणाच्या मोहिमेने राज्यात सर्वत्रच वेग घेतला असे नाही. त्यामुळे या संसर्गजन्य आजाराची लागण अनेक जनावरांना झाली असून अकोल्यामध्ये तर जनावरांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लसीकरण अधिक गतीने आणि गांभिर्यांने होणे आवश्यक आहे.
लाळ्या-खुरकूत हा शक्यतो (milk production) दुभत्या जनावरांना अधिक प्रमाणात होतो. हिवाळ्याला सुरवात झाली असून हवेत आता गारवा आहे. त्यामुळे या संसर्ग रोगाचा प्रसार अधिक होत आहे. मध्यंतरी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाच्यावतीने लसीकरण सुरु करण्यात आले होते. पण राज्यात सर्वत्रच ह्या लसीकरणाला सुरवात झाली असे नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात हा आजाप वाढत आहे.
* आजही ग्रामीण भागात जनावराने अधिकची लाळ गाळली तर चप्पल जीभेवर घासली जाते. मात्र, असे न करता जर या आजाराची साथच सुरु असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. किंवा ज्या जनावराला आजार झाला आहे त्याच्या शेजारी निरोगी जनावर हे बांधू नये किंवा त्याचा चाराही त्याला देऊ नये कारण लाळ्या आजार हा लाळेपासूनच पसरतो.
* लाळ्या खुरकत झालेल्या जनावरांपासून निरोगी जनावरे ही वेगळी बांधणे आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता त्याची स्वतंत्र सोय करावी
* ज्या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी.
* जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत. भांड्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल.
* जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यता होत नाही.
* लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणासाठी लसीकरण हे सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे.
मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गतवर्षीची लसीकरण मोहिमच झाली नव्हती. त्यामुळे यंदा तरी हिवाळा सुरु होण्यापूर्वी लसीकरण झाले तर संकट टळणार आहे. म्हणून महिन्याभरापूर्वीच अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरणाला सुरवात झाली होती. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरण झाले नसल्याने सातारा परिसरात हा संसर्गजन्य आजार वाढत आहे. शासनाकडून लसीचा पुरवठा झाला आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ही लस जनावरांच्या गोठ्यात पोहचलेलीच नाही. यामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होत असून आजार बळावत आहे.
लाळ्या-खुरकूत हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे गोठ्यातील एकाही जनावराला त्याची लागण झाली तर धोका हा सर्वानाच असतो. याची लागण झाल्यावर पायाच्या दोन्ही नख्यांच्या मध्यभागी जखम होते. त्यामुळे जनावरे ही लंगडत चालतात. शिवाय तोंडाला आल्यामुळे वैरणही खात नाहीत. आजाराने त्रस्त असलेल्या जनावरांना उठ-बस करतानाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे असाह्य वेदनांपासून बचाव होण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे.
उच्चांकी दर असतानाही कापसाची मोडणी, काय आहेत कारणे?
फळगळतीमुळे उभ्या संत्रा बागांवर कुऱ्हाड, उत्पादन निम्म्यावर
ऐन रब्बीत ‘डीएपी’ खताचा तुटवडा ; पुरवठ्यातही राजकारण, शेतकऱ्यांकडे काय आहे पर्याय?