Banana Crop : दोन दिवसाच्या पावसात केळी बागा आडव्या, पालकमंत्र्यांचा सल्ला शेतकऱ्यांना पडेल का पचणी..!

| Updated on: Jun 12, 2022 | 4:39 PM

जळगाव तालुक्यातील विटनेर भोकर आव्हाने या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली असून या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले असून शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे नुकसान भरपाई ची आर्त हाक दिली आहे.

Banana Crop : दोन दिवसाच्या पावसात केळी बागा आडव्या, पालकमंत्र्यांचा सल्ला शेतकऱ्यांना पडेल का पचणी..!
जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने केळी बागांचे नुकसान झाले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

जळगाव : यंदाच्या वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा (fruit orchard) फळ बागायत शेतकऱ्यांना बसलेला आहे. केवळ अवकाळी पावसामुळेच नाहीतर आता हंगामातील पावसामुळे (Jalgaon) जळगावात (Banana Garden) केळी बागा आडव्या होत आहेत. पावसाबरोबरच वादळी वाऱ्याने सर्वकाही मातीमोल होत आहे. हंगामाच्या तोंडावर केळी बागांचे नुकसान हे दरवर्षीचे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता केळी व्यवस्थापनातच बदल केला तर यातून सुटका असल्याचा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. दोन दिवस जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे केळी बागा आडव्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे तोडणीच्या दरम्यानच ही अवस्था होत असल्याने शेतकऱ्यांनी याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील रावेर यावल मुक्ताईनगर यासह जिल्ह्यात अनेक भागात केळी बागाचे नुकसान झाल्याने पालकमंत्री पाटील यांनी पीक पाहणी करुन पंचनामे कऱण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले

जळगाव तालुक्यातील विटनेर भोकर आव्हाने या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली असून या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले असून शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे नुकसान भरपाई ची आर्त हाक दिली आहे. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे पीक जोपासायचे आणि उत्पन्न पदरात पडत असतानाच असे नुकसान यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. पीक पाहणी करुन नुकसानभरापाई मिळाली तरी उत्पादनाची बरोबरी होणार नाही. आतापर्यंत केळीची तोड होणे गरेजेच होते. पण मध्यंतरीच्या अवकाळीने सर्व गणित कोलमडले आहे.

तरच टळणार बाागांचे नुकसान

गेल्या पाच वर्षापासून जळगाव जिल्ह्यात सातत्याने वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे केळीच्या बागांचे नुकसान होत आहे.हे नुकसान टाळण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन बदलण्याचा सल्ला दिला आहे. याकरिता कृषी विभागाने केळी लागवडीचा कालावधी ते उत्पादन मिळेपर्यंतच्या दरम्यान काय बदल करता येतो का ? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाय आता केळीला फळपिकाचा दर्जा मिळाल्याने मदत आणि उत्पादनवाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

हे सुद्धा वाचा

नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना आशा

पावसाळ्याच्या सुरवातीच्या दोन दिवसातच जळगाव जिल्ह्यातील चित्र बदलले आहे. मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने केळी बागा उध्वस्त तर झाल्याच आहेत पण जमिनदोस्त झाल्याने त्यामधून उत्पादन पदरी पडेल अशी आशाच उरलेली नाही. पीक पाहणी करुन पालकमंत्री यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. सरकारच्या तत्परतेने मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.