नाशिक : संकट आली की ती चौहीबाजूने येतात असाच काहीसा प्रकार सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत होत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीपातील पिकांचे तर नुकसान झालेलेच आहे पण यातून सावरण्यासाठी भाजीपाल्याची लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या पदरीही निराशाच पडलेली आहे. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पण याला ना निसर्गाची साथ मिळतेय ना बियाणे विक्री करणाऱ्यांची. तब्बल दोन एकरात लागवड केलेल्या (cauliflower, crop ) फुलकोबीचे बियाणेच बोगस निघाल्याने एका शेतकऱ्याला या पिकावर रोटर फिरवावा (Bogus seeds) लागला आहे. त्यामुळे उत्पादनावर केलेला खर्च तर वाया गेलाच शिवाय दोन महिन्याची मेहनतही लयाला गेली आहे.
सुटणा तालुक्यातील अंबासन येथील दादाजी भामरे यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन 2 एकरामध्ये फुलकोबीची लागवड केली होती. फुलकोबी जोमात आला होता. वेळोवेळी औषध फवारणी, मशागतीची कामेही केली होती. मात्र, ऐन फळलागवडीच्या दरम्यानच फुकोबीला घडच लागले नाहीत. कंपनीचे बियाणेच बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने आता झालेले नुकसान कसे फरुन काढावे हा प्रश्न भामरे यांच्यासमोर आहे. यासंबंधी त्यांनी कंपनीकडे तक्रारही केली मात्र आता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून फुलकोबीला घडच लागत नव्हते. याबाबत भामरे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनाही विचारणा केली मात्र, बियाणांमध्येच दोष असल्याचे त्यांना सांगण्यात आले. किमान आगामी हंगामातील पिक घेण्याच्या उद्देशाने त्यांनी अखेर दोन एकरातील फुलकोबीवर रोटर फिरवला आहे. यामध्ये त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीकडेही दाद मागून मार्ग निघत नसल्याने भामरे हे हताश झाले आहेत.
फुलकोबीची लागवड केल्यानंतर पीक जोमात होते. शिवाय शेतकरी भामरे यांनी त्याची योग्य जोपासनाही केली. फुलकोबीला पाने लागले आता घडही लागतील अशी आशा त्यांना होती. मात्र, काही दिवस लोटूनही फळ न लागल्याने त्यांची निराशा झाली आहे. आगामी हंगामातील पिक घेण्यासाठी त्यानी अखेर फुलकोबीची मोडणी केली आहे. (Bogus seeds of cauliflower, huge loss to farmer in Nashik )
‘फळबागा नको गांजा लावण्याची परवानगी द्या’ ; यवतमाळमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव
आता पावसाचा नव्हे, कमी तापमानाचा धोका, पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव
सोयाबीनच्या घसरत्या दरात शेतकऱ्यांनी ‘असे’ करावे नियोजन, कृषितज्ञांचा सल्ला